IND vs BAN Test Series : बांगलादेश कसोटी मालिकेआधी टीम इंडियाच्या त्रिकुटासाठी गूड न्यूज

| Updated on: Sep 11, 2024 | 10:37 PM

IND vs BAN Test: टीम इंडिया बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. अशात भारताच्या 3 खेळाडूंना आनंदाची बातमी मिळाली आहे.

1 / 6
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 2 सामन्यांची मालिका असणार आहे. त्याआधी आजी-माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह यशस्वी जयस्वाल या त्रिकुटाने आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये झेप घेतली आहे. रोहित शर्मा पाचव्या स्थानी पोहचला आहे. (Photo Credit : Shubman gill X Account)

2 / 6
टीम इंडियाचा सलामीवीर मुंबईकर यशस्वी जयस्वाल याने सहाव्या स्थानी झेप घेतलीय. त्याआधी यशस्वी पाचव्या क्रमांकावर होता. यशस्वीची बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. (Photo Credit : Shubman gill X Account)

3 / 6
रोहित शर्मा-यशस्वी जयस्वाल यासह विराट कोहलीलाही तितकाच फायदा झाला आहे. विराट सातव्या स्थानी पोहचला आहे. (Photo Credit : Bcci)

4 / 6
भारतीय क्रिकेट संघ कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी विराजमान आहे.  (Photo Credit : Shubman gill X Account)

5 / 6
टीम इंडियाचा अष्टपैलू आर अश्विन हा गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. तर रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर आहे. (Photo Credit : R Ashwin X Account)

6 / 6
तर पहिल्या 10 फलंदाजांमध्ये टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याचा समावेश नाही. शुबमन गिल 19 व्या स्थानी आहे. (Photo Credit : Shubman gill X Account)