Rohit Sharma : रोहित शर्मा याला ख्रिस गेल याचा तो विक्रम मोडायचा आहे, एका मुलाखतीत स्पष्टच सांगितलं की…
Rohit Sharma Chris Gayle : रोहित शर्मा याच्या नेतृत्वाकडून भारतीय क्रीडारसिकांना खूप आशा आहेत. आशिया चषकासोबत वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा आहे. रोहित शर्माने नेपाळ विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. आता त्याला ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याचे वेध लागले आहेत. हा विक्रम आशिया चषकात मोडेल असं दिसतंय.
1 / 5
रोहित शर्मा हा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या फलंदाजीने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. तसेच आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम रचले आहेत. वनडेत त्याच्या नावावर तीन द्विशतकं असून तो एकमेव खेळाडू आहे. आता वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचा विक्रम मोडण्यासाठी सज्ज झाला आहे.
2 / 5
ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. गेलच्या नावावर 483 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 553 षटकार आहेत. तर रोहित शर्मा याच्या नावावर 446 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 539 षटकार मारले आहेत. गेलचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला फक्त 14 षटकार मारायचे आहेत.
3 / 5
रोहित शर्माने आधीच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ख्रिस गेलला मागे टाकलं आहे. रोहित शर्माच्या नावावर 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 182 षटकार आहेत. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल दुसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 173 षटकार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या फिंचच्या नावावर 125, तर गेलच्या नावावर 124 षटकार आहेत.
4 / 5
रोहित शर्मा याला एका मुलाखतीत ख्रिस गेलचा षटकारांचा विक्रम मोडणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित हसला आणि म्हणाला की, असे झाले तर हा एक अनोखा विक्रम असेल. मी आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की, गेलचा विक्रम मोडेल.
5 / 5
हिटमॅन हे नाव कसं पडलं असा प्रश्नही त्याला विचारला गेला. तेव्हा त्याने सांगितलं की, हे लोकांना विचारावं लागेल. पण याबद्दल तुला काय वाटते? असे विचारले असता रोहित म्हणाला की, चेंडू जोरात मारायला आवडतो. लहानपणापासूनच हवेत शॉट्स खेळायला शिकलो.