Team India : कर्णधार रोहित शर्मा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मागावर, आता मोडणार हे विक्रम

| Updated on: Aug 01, 2023 | 6:23 PM

रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये अनेक शिखरं गाठली आहेत. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. कोणते विक्रम मोडणार ते जाणून घ्या..

1 / 6
आशिया कप स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाण्याची शक्यता आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेले काही विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

2 / 6
सचिन तेंडुलकर याने आशिया कप स्पर्धेत एकूण 23 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यातील 21 डावात त्याने 971 धावा केल्या आहेत. आता रोहित शर्मा भारतासाठी आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा  करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेणार असल्याचं दिसत आहे. रोहित शर्मा याच्या नावावर 745 धावा असून हा विक्रम मोडण्यासाठी 226 धावा आवश्यक आहेत.

3 / 6
Team India : कर्णधार रोहित शर्मा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मागावर, आता मोडणार हे विक्रम

4 / 6
सचिन तेंडुलकर याने आशिया कप स्पर्धेत 23 सामने खेळले आहेत. रोहित शर्मा याने आशिया कपमध्ये आतापर्यंत 22 सामने खेळले आहे. एक सामना खेळताच तो या विक्रमाची बरोबरी करेल आणि दुसऱ्या सामन्यात विक्रम मोडीत काढेल.

5 / 6
आशिया कप स्पर्धेत सचिन तेंडुलकर याच्या नावावर दोन शतकांची नोंद आहे.रोहित शर्मा याने आशिया कप स्पर्धेत एक शतक झळकवलं आहे. एक शतक झळकवताच विक्रमाची बरोबरी होईल आणि दुसरं शतक झळकावताच विक्रम मोडला जाईल.

6 / 6
सचिन तेंडुलकरने 1990 ते 2012 या कालावधीत आशिया कप स्पर्धेत एकूण 51.10 च्या सरासरीने 971 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा याने या स्पर्धेतील खेळलेल्या सामन्यात 46.56 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.