IPL 2024 : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएलमध्ये रचला दुर्मिळ विक्रम, वाचा काय केलं ते
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्याच सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावून टी20 वर्ल्डकपसाठी आपल्याला रेसमध्ये आणलं आहे. तसेच आयपीएलमध्ये एका विक्रमाची नोंद केली आहे. चला जाणून घेऊयात काय विक्रम केला ते..
1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेतील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमवून 193 धावा केल्या आणि विजयासाठी 194 धावांचं आव्हान दिलं. मात्र लखनौचा संघ 173 धावा करू शकला आणि 20 धावांनी पराभव झाला.
2 / 6
जोस बटलर 11 धावा करून बाद झाल्यानंतर संजू सॅमसन मैदानात उतरला. यावेळी त्याने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. सुरुवातीपासूनच लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांवर भारी पडला. त्याने 52 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या.
3 / 6
अर्धशतकी खेळीसह संजू सॅमसनने आयपीएल इतिहासात एका दुर्मिळ विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात त्याने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या रेकॉर्डच्या आसपासही कोणीही नाही.
4 / 6
आयपीएल 2020 मध्ये पहिल्या सामन्यात 74, 2021 मध्ये 119 धावा, 2022 मध्ये 55 आणि 2023 मध्ये 55 धावा केल्या होत्या. आता नाबाद 82 धावांची खेळी केली आहे.
5 / 6
संजू सॅमसनने नाबाद 82 धावांची खेळी करून सलग पाच हंगामात 50+ धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा आयपीएलमधील एकमेव कर्णधार ठरला आहे.
6 / 6
राजस्थान रॉयल्सचा पुढचा सामना 28 मार्चला दिल्ली कॅपिटल्स, त्यानंतर 31 मार्चला चेन्नई सुपर किंग्स आणि 6 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे.