IND vs AUS | टीम इंडियासोबत 6 वर्षांनी पहिल्यांदाच असं घडलं, नक्की काय झालं?
Indian Cricket Team | भारतीय क्रिकेट संघाने 23 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियावर 1 चेंडू राखून 2 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने मालिकेची विजयी सुरुवात केली. मात्र टीम इंडियासोबत 6 वर्षांनी अप्रिय घटना घडली.
1 / 5
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सूर्यकुमार यादव याला कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देता आला. मात्र टीम इंडियासोबत टी 20 क्रिकेटमध्ये 6 वर्षांनी पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.
2 / 5
पहिल्या टी 20 सामन्यात यशस्वी जयस्वाल याच्या चुकीच्या कॉलमुळे ऋतुराज गायकावड एकही बॉल न खेळता रनआऊट झाला. अशाप्रकारे ऋतुराज टी 20 क्रिकेटमध्ये एकही बॉल न खेळता आऊट होणारा टीम इंडियाचा तिसरा प्लेअर ठरला. याआधीचे 2 खेळाडू कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात.
3 / 5
ऋतुराज गायकवाड याच्याआधी टीम इंडियाने 2 फलंदाज हे टी 20 क्रिकेटमध्ये एकही बॉल न खेळता झिरोवर आूट झाले आहेत. यामध्ये अमित मिश्रा आणि जसप्रीत बुमराह हे दोघे एकही बॉल न खेळता तंबूत परतले आहेत.
4 / 5
ऋतुराजच्या आधी टी 20 क्रिकेटमध्ये 6 वर्षांपूर्वी अमित मिश्रा एकही बॉल न खेळता तंबूत परतला होता. मिश्रा 2017 साली इंग्लंड विरुद्ध झिरोवर आऊट झाला होता.
5 / 5
तर टीम इंडियाकडून सर्वात आधी जसप्रीत बुमराह पहिल्यांदा एकही बॉल न खेळता झिरोवर आऊट होणारा फलंदाज ठरला. बुमराह श्रीलंका विरुद्ध 2016 मध्ये डायमंड डक झाला होता.