फ्लॉवर नहीं फायर है..! ऋतुराज गायकवाडची चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी वादळी खेळी
विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराज गायकवाडने आक्रमक शतकी खेळी केली. महाराष्ट्राचा कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाडने 74 चेंडूत नाबाद 148 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियाचं डाव ठोठावलं.
1 / 6
ऋतुराज गायकवाड गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. मात्र त्याला हवी तशी संधी मिळत नाही अशी क्रीडाप्रेमींची ओरड आहे. पण ऋतुराज गायकवाडने विजय हजारे स्पर्धेत दमदार खेळी करत पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे.
2 / 6
विजय हजारे ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्र आणि सर्व्हिसेस संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने आक्रमक खेळी करत विरोधी संघाच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. तसेच विजय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं.
3 / 6
ऋतुराज गायकवाडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करत सर्व्हिसेस संघाने 48 षटकात सर्व बाद 204 धावा केल्या.
4 / 6
सर्व्हिसेसचा कर्णधार मोहित अहलावतने सर्वाधिक 61 धावा केल्या. तर इतर फलंदाजांना 30 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. या सामन्यात महाराष्ट्र संघाकडून प्रदीप दधे आणि सत्यजित बच्छाव यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
5 / 6
विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य ठेवलेल्या महाराष्ट्र संघाला ऋतुराज गायकवाडने वेगवान धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. या खेळीत त्याने 74 चेंडूत नाबाद 148 धावा केल्या. गायकवाडच्या खेळीत 16 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता. ऋतुराजच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळे महाराष्ट्र संघाने अवघ्या 20.2 षटकांत विजय मिळवला.
6 / 6
महाराष्ट्राने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकण्यात ते यशस्वी झाले. सर्व्हिसेसपूर्वी महाराष्ट्राचा सामना राजस्थानशी झाला. त्या सामन्यातही महाराष्ट्र संघाने ३ गडी राखून विजय मिळवला होता.