IPL फ्रँचायझी गॅसवर, दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने उडवली झोप
IPL 2022 ही स्पर्धा 26 मार्चपासून सुरू होत आहे आणि त्याआधी सर्व फ्रँचायझींसमोर एक नवीन समस्या उभी राहिली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघाच्या घोषणेमुळे आयपीएल संघांच्या अडचणी वाढल्या आहेत.
1 / 5
IPL 2022 ही स्पर्धा 26 मार्चपासून सुरू होत आहे आणि त्याआधी सर्व फ्रँचायझींसमोर एक नवीन समस्या उभी राहिली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघाच्या घोषणेमुळे आयपीएल संघांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये 8 खेळाडू असे आहेत ज्यांना आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. (PC-AFP)
2 / 5
बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली असून, या संघाची कमान टेम्बा बावुमा याच्या हाती सोपवण्यात आली आहे. क्विंटन डी कॉक, मार्को यान्सिन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा आणि रसी व्हॅन डर दुसान यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. हे सर्व खेळाडू आयपीएल संघांचा भाग आहेत. (PC-AFP)
3 / 5
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 18 मार्चपासून सुरू होणार आहे. वनडे मालिका 23 मार्चपर्यंत चालणार आहे. तर 26 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत रबाडा, डीकॉक सारखे खेळाडू या स्पर्धेतील सलामीचा सामना खेळू शकणार नाहीत. (PC-AFP)
4 / 5
राष्ट्रीय संघासाठी एकदिवसीय मालिका खेळायची की आयपीएलचा भाग बनायचे हा निर्णय दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंवर सोडला आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी वनडे मालिकेला प्राधान्य दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार डीन एल्गरनेही खेळाडूंना राष्ट्रीय संघातून खेळण्यास सांगितले होते. (PC-AFP)
5 / 5
बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बावुमा, केशव महाराज, क्विंटन डी कॉक, हमजा, मार्को यान्सन, जानेमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, व्हॅन डर दुसान आणि वीरेने. (PC-AFP)