SA vs ENG : वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या नावावर नकोसा विक्रम, काय केलं ते जाणून घ्या
World Cup 2023, SA vs ENG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडची स्थिती एकदम बिकट झाली आहे. चार पैकी तीन सामने गमवल्याने एकदम तळाला पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेने मोठ्या फरकाने पराभूत केल्याने पुरती वाट लागली आहे.
1 / 6
इंग्लंडने पहिल्यांदा घेतलेला गोलंदाजीचा निर्णय अंगलट आला. दक्षिण आफ्रिकेने 400 धावांचं लक्ष्य दिलं. पण इंग्लंडचा संघ 170 धावाच करू शकला. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 229 धावांनी पराभूत केलं.
2 / 6
इंग्लंडचा वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात मोठा पराभव आहे. तर दक्षिण आपला विक्रम मोडण्यात अपयशी ठरली आहे. मोठ्या फरकाने पराभूत करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे.
3 / 6
ऑस्ट्रेलियाने 2022 मध्ये इंग्लंडला 221 धावांनी पराभूत केलं होतं. 2018 मध्ये श्रीलंकाने इंग्लंडला 219 धावांनी नमवलं होतं. आता इंग्लंडला 229 धावांनी पराभूत करण्यात आलं आहे.
4 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंची स्थिती एकदम वाईट आहे. चार पैकी तीन सामने गमवल्याने नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीची वाट बिकट झाली आहे.
5 / 6
इंग्लंडला उपांत्य फेरी गाठण्यासाठी उर्वरित पाच पैकी पाच सामने जिंकणं आवश्यक आहे. तसेच एखाद्या सामन्यात चमत्काराची गरज आहे.
6 / 6
इंग्लंडचा पुढचा सामना 26 ऑक्टोबरला श्रीलंकेशी होणार आहे. तर 29 ऑक्टोबरला लखनऊच्या एकाना मैदानात भारत विरुद्ध इंग्लंड सामना होईल.