Sanju Samson चा कारनामा, आजी माजी कॅप्टन रोहित-सूर्यकुमारचा रेकॉर्ड उद्धवस्त

| Updated on: Nov 16, 2024 | 1:00 PM

Sanju Samson Century : जोहान्सबर्ग येथे झालेल्या चौथ्या आणि टी 20i सामन्यात संजू सॅमसन याने त्याच्या कारकीर्दीतील तिसरं शतक झळकावलं. संजूने यासह वर्ल्ड रेकॉर्ड करत आजी माजी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा या दोघांचा रेकॉर्ड उद्धवस्त केला.

1 / 6
संजू सॅमसन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात शतकी खेळी केली. संजूने 51 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने शतक पूर्ण केलं.

2 / 6
तसेच संजूने 56 चेंडूत 9 षटकार आणि 6 चौकारांसह 194.64 च्या स्ट्राईक रेटने 109 धावा केल्या. संजूच्या टी 20i कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं.

3 / 6
संजूने या शतकी खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड केला. तसेच संजूने अनेक दिग्गजांना मागे टाकत रेकॉर्ड ब्रेक केला.

4 / 6
आतापर्यंत एका वर्षात टी 20i क्रिकेटमध्ये 3 शतकं कोणत्याच फलंदाजाला करता आलीत नाहीत. मात्र संजूने हे अवघ्या 35 दिवसांमध्ये करुन दाखवलं. संजूने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यात 12 ऑक्टोबरला, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 आणि त्यानंतर 15 नोव्हेंबरला शतक केलं.

5 / 6
संजूने यासह टी 20i क्रिकेटमध्ये एका वर्षात 3 शतकं करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आणि इतिहास घडवला.

6 / 6
संजूने या तिसऱ्या शतकासह चौघांना मागे टाकलं. संजूने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कॉलिन मुनरो आणि रायली रुसो या चौघांचा एका वर्षात 2 शतकांचा रेकॉर्ड उद्धवस्त केला.