SA vs IND | दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया खेळणार 8 सामने, जाणून घ्या वेळापत्रक

| Updated on: Dec 06, 2023 | 9:50 PM

IND vs SA | दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. एकदिवसीय मालिकेत केएल राहुल हा कॅप्टन्सी करेल. तर कसोटी मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे सूत्र आहेत.

1 / 5
टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकांमध्ये 3 वेगवेगळे कर्णधार असणार आहेत. 10 डिसेंबरपासून टी20 मालिकेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना हा अनुक्रमे 12 आणि 14 डिसेंबरला होईल.

2 / 5
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिकेतील तिन्ही सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील. टी 20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.

3 / 5
उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होईल. जोहान्सबर्गला सलामीचा सामना होईल. तर त्यानंतर 19 डिसेंबरला दुसरा आणि 21 डिसेंबरला तिसरा सामना होईल. पहिल्या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर उर्वरित 2 सामन्यांना दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.

4 / 5
त्यानंतर दौऱ्याची सांगता ही कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही मालिका असणार आहे. मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरला होणार आहे. पहिला सामना सेंच्युरियन इथे होणार आहे. तर दुसरा आणि शेवटचा सामना हा 3 जानेवारीला केपटाऊन इथे होणार आहे.  या दोन्ही सामन्यांना दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

5 / 5
टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिन्ही मालिकांमधील प्रत्येक सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर मोबाईलवर सामना पाहण्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार एप डाऊनलोड करावा लागेल.