विंडिज विरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डीकॉक हा झिरोवर आऊट झाला. त्यामुळे डी कॉकवर टीका करण्यात आली होती. मात्र आता दुसऱ्याच टी 20 मध्ये शतक ठोकत डीकॉक याने टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे. या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विंडिदने विजयासाठी दिलेलं 259 धावांचं आव्हान 7 बॉल राखून पूर्ण केलं.
क्विंटन डीकॉक याने अवघ्या 43 बॉलमध्ये शतक ठोकलं. डीकॉक याचं हे पहिलंवहिलं टी 20 शतक ठरलं.
डीकॉक याने आधी अवघ्या 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. यासह डीकॉक दक्षिण आफ्रिकेकडून टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.
डीकॉक याने एकूण 44 बॉलमध्ये 100 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 8 सिक्स ठोकले.
डीकॉक आणि रिजा हँड्रिक्स या सलामी जोडीने 10.5 ओव्हरमध्ये 152 धावांची भागीदारी केली. डीकॉक आऊट झाल्यानंतर हँड्रिक्स आणि एडन मार्करम या जोडीने फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेला 7 बॉलआधी विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.