Sachin Dhas | जिंकलंस आणि जिंकवलंस, बीडच्या सचिनने टीम इंडियाला फायनलमध्ये पोहचवलं
Sachin Dhas | टीम इंडियाची दक्षिण आफ्रिके विरुद्ध घसरगुंडी झाली होती. मात्र बीडच्या सचिन धस याच्या बॅटिंगसमोर दक्षिण आफ्रिका ठस झाली. सचिनने टीम इंडियाच्या विजयात मोठं योगदान दिलं.
1 / 5
टीम इंडिया आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 245 धावांचं आव्हान हे 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बीडचा सचिन धस हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.
2 / 5
सचिन धस याने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक भूमिका बजावली. सचिनने 95 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 षटकारासह 96 धावा केल्या.
3 / 5
सचिनने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर सचिनने गिअर बदलत फटकेबाजी केली. मात्र दुर्देवाने सचिन शतकाजवळ पोहचून शतक करु शकला नाही. मात्र त्याच्या या खेळीने टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकवला.
4 / 5
टीम इंडियाची 245 धावांचा पाठलाग करताना 4 बाद 32 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन उदय सहारन आणि सचिन धस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची विक्रमी भागीदारी करत टीम इंडियचा विजय निश्चित केला.
5 / 5
दरम्यान आता टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून दूर आहे. सेमी फायनलमधील दुसरा सामना हा 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळेल. हा महाअंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.