India vs Pakistan | आशिया कपआधी टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, कोण जिंकणार?
Asia Cup 2023 IND vs PAK | क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आशिया कप स्पर्धेतील भारत-पाक सामन्याकडे लागलंय. या सामन्याला अजून वेळ आहे. मात्र त्याआधी आज टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत.
1 / 7
आशिया कप स्पर्धेला अजून काही दिवस बाकी आहेत. क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे भारत-पाक सामन्याकडे लागलंय. या अशिया कप स्पर्धेआधी टीम इंडिया-पाकिस्तान आज आमनेसामने भिडणार आहेत. फुटबॉल सामन्यात या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
2 / 7
थोडक्यात काय तर विराट कोहलीआधी त्याचा मित्र म्हणजे भारतीय फुटबॉल टीमचा कॅप्टन सुनील छेत्री याच्या नेतृत्वात पाकिस्तान विरुद्ध लढणार आहे. टीम इंडिया या सामन्यातूनच SAFF चॅम्पियनशीप मोहिमेला सुरुवात करेल.
3 / 7
भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला आज म्हणजेच 21 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे के श्री कांतीरवा स्टेडियममध्ये करण्यात आलंय. टीम इंडियाने या स्टेडियममध्ये अखेरचा सामना 2017 मध्ये मकाऊ विरुद्ध खेळला होता. टीम इंडियाने तेव्हा मकाऊवर 4-1 ने विजय मिळवला होता
4 / 7
आता टीम इंडियाची गाठ ही पाकिस्तानशी आहे. टीम इंडियाचं लक्ष हे एफसी एशिया कप 2024 मध्ये क्वालिफाय करण्याकडे असणार आहे. मात्र यासाठी टीम इंडियाला पाकिस्तान पराभूत करण्यासह नवव्यांदा एसएएफएफ चॅम्पयिन व्हावं लागेल.
5 / 7
टीम इंडियाची बाजू मजबूत आहे. पाकिस्तान फीफा रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या तुलनेत 94 ने पिछाडीवर आहे. तर पाकिस्तान सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. पाकिस्तानला नुकतच केनिया, मॉरिशसह एकूण 4 टीमच्या स्पर्धेत सर्वच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
6 / 7
दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने काही दिवसांपूर्वी इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकला होता. आता एसएएफएफ चॅम्पियनशीप विजेतेपद जिंकलं तर टीम इंडिया महिन्याभरात दुसरी स्पर्धा जिंकेल.
7 / 7
टीम इंडिया एसएएफएफ चॅम्पियनशीप पूल एमध्ये आहे. या पूल एमध्ये कुवैत, नेपाळ आणि पाकिस्तान टीमचा समावेश आहे. तर पूल बीमध्ये बांगलादेश, लेबनान, भूटान आणि मालदीव टीमचा समावेश आहे.