साई सुदर्शनला आयपीएलपेक्षा टीएनपीएलमध्ये जास्त पैसे, किती ते जाणून घ्या
आयपीएल 2023 स्पर्धेत साई सुदर्शनने जबरदस्त कामगिरी केली होती. पण त्या तुलनेत तितके पैसे मिळत नव्हते. आता साई सुदर्शनला टीएनपीएलमध्ये चांगला मोबादला मिळत आहे.
1 / 6
आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शानदार फलंदाजीमुळे चर्चेत असलेला साई सुदर्शन आता पुन्हा चर्चेत आला आहे. फरक एवढाच की यावेळी तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये आहे.
2 / 6
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात साई सुदर्शनने 45 चेंडूत 4 उत्तुंग षटकार आणि 8 चौकारांसह 87 धावा केल्या. त्याने लायका कोवई किंग्ज संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
3 / 6
साई सुदर्शनला आयपीएलमध्ये जितके पैसे मिळतात त्यापेक्षा जास्त रक्कम लायका कोवई किंग्ज देत आहे.
4 / 6
गुजरात टायटन्स फ्रँचायसीने आयपीएल 2022 च्या लिलावात साई सुदर्शनला अवघ्या 20 लाख रुपयांना विकत घेतले. यावेळच्या आयपीएलमध्येही 20 लाख रु. मानधन देण्यात आले होते.
5 / 6
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या लिलावात लायका कोवई किंग्ज फ्रेंचाइसीने साई सुदर्शनला 21.60 लाख रुपयांना विकत घेतले.
6 / 6
तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये साई सुदर्शनला आयपीएलपेक्षा जास्त पगार मिळत आहे. आता साई पुढच्या सीझनच्या आयपीएल लिलावात दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.