Cricket | क्रिकेटर ते अ‍ॅक्टर, बॉलिवूडमध्ये येण्याआधी ‘हे’ 5 जण खेळायचे क्रिकेट

| Updated on: Jun 24, 2023 | 8:52 PM

Cricket To Bollywood | क्रिकेट आणि बॉलिवडूचा गेल्या अनेक दशकांचा संबंध आहे. आताच्या घडीला असे काही अभिनेते आहेत, जे कधी काळी क्रिकेटर होते. या 5 जणांपैकी एकाने तर सचिनसोबत डेब्यू केलं होतं. पाहा फोटो

1 / 5
अभिनेता अंगद बेदी हा क्रिकेटर बिशनसिंह बेदी यांचा मुलगा. अंगदला वडिलांप्रमाणेच क्रिकेटरच व्हायचं होतं. त्यानुसार अंगदने योग्य पाऊल टाकलेलं. मात्र अंगदला अभिनयाची चटक लागली आणि त्याने बॉलिवूडचा मार्ग निवडला. अंगदने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये अभियन केलाय.

2 / 5
हार्डी संधू याने 83 या क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर आधारित सिनेमात मदन लाल यांची भूमिका साकरली होती. हार्डी आधी क्रिकेटर होता. अहो इतकंच काय हार्डीने अंडर 19 टीम इंडियाकडून खेळलाय. तसेच दिल्लीकडून रणजी ट्रॉफीतही खेळलाय. मात्र हार्डीने अभिनय आणि गायनाचं क्षेत्र निवडलं.

3 / 5
करण वाही यानेही छोट्या पडद्यासह अनेक सिनेमांमध्ये आपली छाप सोडली. करण दिल्लीसाठी अंडर 19 टीमकडून खेळलाय. विशेष म्हणजे करण त्यावेळेस शिखर धवन आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या आताच्या दिग्गजांसोबत खेळलाय. करणला दुखापत झाल्याने त्याने क्रिकेटपासून फारकत घेतली आणि अभिनयाला जवळ केलं.

4 / 5
टीव्ही अभिनेता समर्थ हा छोट्या पडद्यावरील मालिका 'मैत्री'आणि 'उडारिया'च्या माध्यमातून घरोघरी परतला. समर्थने क्रिकेट म्हणून राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे.

5 / 5
सलिल अंकोल टीम इंडियाकडून 20 एकदिवसीय 1 कसोटी सामना खेळला आहे. विशेष बाब म्हणजे सलील अंकोलने सचिन तेंडुलकर याच्यासोबत पदार्पण केलं होतं. मात्र त्यानंतर सलीलने अभिनयाची वाट चोखाळली.