टेनिस स्टार सानिया मिर्झा पूर्वपती शोएब मलिक याने नुकतंच दुसरं लग्न केलं. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी विवाह केला आहे.
शोएब आणि सना यांच्या लग्नानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या लग्नाची लव्हस्टोरीची चर्चा होतेय. या दोघांची लव्हस्टोरी कशी आहे? पाहूयात...
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांची 2003 ला पहिली भेट झाली. या भेटीत सानियाने शोएबला अजिबात भाव दिला नव्हता. तेव्हा सानियाला शोएबचा स्वभाव आवडला नव्हता.
2009 ला सानिया आणि शोएबची दुसरी ऑस्ट्रेलियातील होबार्टमध्ये भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये बातचित सुरु झाली. 2010 ला या दोघांनी लग्न केलं.
30 ऑक्टोबर 2018 ला सानिया आणि शोएब यांना इजहान हा गोंडस मुलगा झाला. मागच्या काही दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होत होती. आता आज शोएबच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर आलेत.