संजू सॅमसनने शून्यावर बाद होताच मोडला 15 वर्षे जुना नकोसा विक्रम
दुसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण अफ्रिकेने कमबॅक केलं आहे. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकापासून भारतावर दबाव तयार केल्या. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनला शून्यावर बाद केलं. संजू सॅमसन शून्यावर बाद होताच नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
1 / 5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी20 सामना सुरु आहे. भारताने या सामन्यात 20 षटकात 6 गडी गमवून 124 धावा केल्या आणि विजयासाठी 125 धावांचं आव्हान दिलं. हार्दिक पांड्या वगळता आघाडीचे फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.
2 / 5
टी20 सामन्यात संजू सॅमसनने सलग दोन शतकं ठोकली होती. त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र त्याने तीन चेंडूंचा सामना केला आणि भोपळा न फोडताच तंबूत परतला. त्याच्या या खेळीमुळे 15 वर्षे जुना नकोसा विक्रम नावावर केला आहे.
3 / 5
संजू सॅमसन एका वर्षात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणार खेळाडू ठरला आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन वेळा शून्यावर बाद झाला होता. तर आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पुन्हा एका भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे भारताकडूनही सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणार खेळाडू ठरला आहे.
4 / 5
संजू सॅमसनपूर्वी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता. युसूफ पठाण 2009 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते न उघडता तीन वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला होता. आता संजू सॅमसन चार वेळा शून्यावर बाद झाला आहे.
5 / 5
भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये वर्षभरात सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट झालेले खेळाडू यादीत संजू सॅमसन आघाडीवर आहे. युसूफ पठाण 3 वेळा (2009), रोहित शर्मा 3 वेळा (वर्ष 2018), रोहित शर्मा 3 वेळा (वर्ष 2022), विराट कोहली 3 वेळा (वर्ष 2024) बाद झाला आहे.