टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आयर्लंड दौरा करणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. त्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशान किशन याला आयर्लंड दौऱ्यात विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
संजू सॅमसन याने 3 जानेवारी 2023 रोजी श्रीलंका विरुद्ध अखेरचा टी 20 सामना खेळला होता. संजू फ्लॉप ठरल्यानंतर त्याला वगळण्याच आलं.
सॅमसनने टी 20 कारकीर्दीत 20.6 च्या सरासरीने 16 डावात 301 धावा केल्या आहेत. यामध्ये एकमेव अर्धशतकाचा समावे आहे. त्यामुळे संजूला आयर्लंड दौऱ्यात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.
संजूला विंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेत संधी दिली गेली आहे. त्यामुळे संजू या मालिकांमध्ये संजू कशी कामगिरी करतो, याकडेही निवड समितीचं बारीक लक्ष असेल.