सरफराज खानची डेब्युमध्ये ऐतिहासिक कामगिरी, लिटील मास्टरांच्या क्लबमध्ये एन्ट्री
Sarfaraz Khan | फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या सरफराज खान याने पदार्पणात इंग्लंड विरुद्ध धमाका करत दोन्ही डावात अर्धशतक केलं. सरफराजची यासह खास क्लबमध्ये एन्ट्री झाली आहे.
1 / 6
मुंबईकर सरफराज खान याला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10 वर्ष घाम गाळल्यानंतर टीम इंडियात संधी मिळाली. सरफराजने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीतून पदार्पण करत धमाका केला.
2 / 6
सरफराजने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. सरफराजने दुसऱ्या डावात नाबाद 68 धावांची खेळी केली.
3 / 6
तर सरफराजने पहिल्या डावात 62 धावा केल्या. सरफराज यासह पदार्पणात अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय आणि तिसरा मुंबईकर ठरला आहे.
4 / 6
सरफराज खान याच्याआधी टीम इंडियाकडून पदार्पणातील दोन्ही डावात अर्धशतकं लगावण्याची कामगिरी ही मुंबईकर श्रेयस अय्यर याने केली होती. श्रेयसने 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 105 आणि 65 धावा केल्या होत्या.
5 / 6
सुनील गावसकर यांनी 1971 साली वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. गावसकर यांनी तेव्हा दोन्ही डावात 65 आणि 67 धावा केल्या होत्या.
6 / 6
तर भारतासाठी पदार्पणात पहिल्यांदा दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करण्याचा कारनामा हा दिलावर हुसैन यांनी केला होता. हुसैन यांनी इंग्लंड विरुद्ध 59 आणि 57 धावा केल्या होत्या.