Team India | कमबॅकसह टीम इंडियात कॅप्टन्सीची! या अनुभवी खेळाडूला लॉटरी
Team India Captaincy | टीम इंडियात विंडिज दौऱ्यासाठी काही खेळाडूंना विश्रांती आणि डच्चू देण्यात आला आहे. त्यातच आता टीम इंडियाचा कर्णधार बदलणार असल्याची चर्चा रंगली आहे.
1 / 5
शिखर धवन गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र धवनची टीम इंडियात एन्ट्री होऊ शकते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिखर धवन याला एशियन गेम्समध्ये टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात येऊ शकते.
2 / 5
एशियन गेम्स स्पर्धेचं चीनमधील हांगेझोऊमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेसाठी शिखर धवन याला निश्चितपणे कॅप्टन्सी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
3 / 5
एशियन गेम्ससाठी खेळणारे खेळाडू हे निश्चितपणे आगामी वनडे वर्ल्ड कप 2023 चे भाग नसतील. बीसीसीआयने एशियन गेम्ससाठी टीम इंडियाच्या एका गटाला चीनला पाठवणार आहे. यामध्ये पृथ्वी शॉ, रिंकू सिंह, तिळक वर्मा आणि इतर युवा खेळाडूंचा समावेश असू शकतो.
4 / 5
शिखर धवन याने याआधी टीम इंडियाच्या बी ग्रुपचं कर्णधारपद सांभाळलंय. टीम इंडियाचा मुख्य संघ 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हाच शिखर धवन याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा दुसरा गट हा श्रीलंकेला रवाना झाला होता.
5 / 5
शिखर धवन याला टीम इंडियात वर्ल्ड कपमधून डच्चू मिळण्याची तीव्र शक्यता आहे. शिखरच्या जागी शुबमन गिल याचं स्थान निश्चित मानलं जातंय. त्यामुळे धवनवर एशियन गेम्समधून टीम इंडियाला गोल्डन मेडल जिंकून देण्याची जबाबदारी असणार आहे. (सर्व फोटो - AFP)