IND vs AFG | अफगाणिस्तान विरुद्धची मालिका टीम इंडियाच्या या 5 जणांनी गाजवली

| Updated on: Jan 18, 2024 | 4:58 PM

India vs Afghanistan T20i Series | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी 20 सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर पहिला सुपर ओव्हरही बरोबरीत सुटला. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने विजय मिळवत 3-0 ने मालिका जिंकली.

1 / 5
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे याने अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. शिवमने अनुक्रमे 60,63, आणि 1 अशा धावा केल्या.  शिवमने अशाप्रकारे एकूण 164 धावा केल्या. तसेच शिवमने 2 विकेट्सही घेतल्या. शिवमला त्याच्या या कामिगरीसाठी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

2 / 5
रिंकू सिंहच्या रुपात टीम इंडियाला फिनीशर मिळाला आहे.  रिंकूने आतापर्यंत 15 टी 20 सामन्यांमध्ये 2 अर्धशतक झळकावली आहेत. रिंकूने दुसरं अर्धशतक हे अफगाणिस्तान विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात लगावला. रिंकूने 39 बॉलमध्ये 69 धावांची खेळी केली. रिंकूच्या या खेळीत  2 चौकार आणि 6 सिक्स लगावले.

3 / 5
अक्षर पटेल 3 पैकी 2 सामने खेळला. अक्षरने या 2 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. अक्षरने निर्णायक भूमिका बजावली.

4 / 5
अमरावतीकर विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्मा यानेही योगदान दिलं. पहिल्या सामन्यात टीम इंडियाची 3 बाद 72 अशी स्थिती झाली. त्यानंतर जितेशने शिवमला साथ देत 45 धावांची भागीदारी केली. जितेशने 31 धावा केल्या होत्या.

5 / 5
यशस्वी अफगाणिस्तान विरुद्ध 3 पैकी अखेरचे 2 सामने खेळला. या 2 सामन्यात त्याने अनुक्रमे 68 आणि 4 धावा केल्या. यशस्वीने टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात तडाखेदार सुरुवात करुन दिली.