IND vs PAK सामन्याआधी शोएब अख्तर याने दिलं टीम इंडियाला ओपन चॅलेंज, काय म्हणाला वाचा
IND vs PAK: आशिया कप 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. दुसरीकडे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने टीम इंडियाला ओपन चॅलेंज दिलं आहे.
1 / 6
आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने सामना अतितटीचा होणार यात शंका नाही. मात्र या सामन्यापूर्वीच शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. सोशल मीडियावर दोन्ही संघांचे चाहते भिडले आहेत.
2 / 6
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने टीम इंडियाला ओपन चॅलेंज दिलं आहे.
3 / 6
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर श्रीलंकेत दाखल झाला आहे. कोलंबोत दाखल होताच त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्याने टीम इंडियाला इशारा दिला आहे.
4 / 6
"पावसाचं काहीच टेन्शन नाही. पाकिस्तानपासून सावध राहा. " असं शोएब अख्तर याने सांगितलं आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दुसऱ्या सामन्यावरही पावसाचं सावट आहे.
5 / 6
व्हिडीओमध्ये शोएब अख्तर म्हणत आहे की, “देवालाच माहिती, मी किती वर्षांनी कोलंबोला आलो आहे. पण इथे आल्यावर बरं वाटलं. महान देश आणि महान लोक आणि हवामान… सर्वकाही योग्य वाटतं.” नंतर तो हसत हसत म्हणाला, “पाकिस्तानपासून सावध राहा.”
6 / 6
भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाऊस पडला तर एक दिवस राखीव ठेवण्यात आाला आहे. राखीव दिवशीही सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. वनडेत निकाल देण्यासाठी कमीत कमी 20 षटकं खेळणं गरजेचं आहे. पण या सामन्याचा निकाल येईल असं शोएब अख्तरने सांगितलं आहे.