Shreyas Iyer : आशिया कप स्पर्धेपूर्वी श्रेयस अय्यर याची ‘सुपर फोर’ कामगिरी, टीम इंडियाचं टेन्शन दूर

| Updated on: Aug 25, 2023 | 5:32 PM

Shreyas Iyer : वनडे क्रिकेट सामन्यात टीम इंडियासमोर चौथ्या क्रमांकाबाबत बरीच उलथापालथ सुरु आहे. या क्रमांकावर श्रेयस अय्यरची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. पण दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या कमबॅकची चिंता सतावत होती. परतला तरी त्याला तो फॉर्म गवसेल का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पण आता ती चिंता दूर झाली आहे.

1 / 6
आशिया कप स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात दुखापतीतून सावरलेल्या श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचाही समावेश करण्यात आला आहे. पण हे दोन्ही कशी कामगिरी करतील याबाबत प्रश्न विचारला जात आहे.

2 / 6
श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांना संघात स्थान मिळाल्याने मधल्या फळीचा प्रश्न सुटणार आहे. पण दुखापतीतून सावरत लगेचच संघात निवड केल्याने टीका होऊ लागली होती. आता या टीकेला श्रेयस अय्यर याने सणसणीत उत्तर दिलं आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झालेल्या एका सराव सामन्यात श्रेयस अय्यरने 199 धावा केल्या. तसेच दुसऱ्या सराव सामन्यात त्याने संपूर्ण 50 षटके क्षेत्ररक्षण केले. यातून त्याने फिट असल्याचं दाखवून दिलं आहे.

3 / 6
दुखापतीनंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघे बंगळुरूमधील एनसीएमध्ये रिकव्हर होत होते. या दरम्यान ते फिटनेस चाचणीत पास झाले. त्यामुळेच त्यांची संघात निवड केल्याची माहिती निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितलं होतं.

4 / 6
त्यांची निवड योग्य असल्याचं श्रेयस अय्यरने दाखवून दिलं आहे. श्रेयस अय्यरने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे सराव सामन्यात 199 धावा केल्या. तसेच दुसऱ्या सराव सामन्यात त्याने संपूर्ण 50 षटके क्षेत्ररक्षण केले.

5 / 6
श्रेयस अय्यरच्या या कामगिरीमुळे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटल्याचं बोललं जात आहे. अय्यरच्या या खेळीमुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढल आहे. भारताचा आशिया कप स्पर्धेत पहिला सामना पाकिस्तानसोबत आहे. श्रेयस अय्यर मार्च 2023 पासून संघाबाहेर आहे.

6 / 6
आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, मोहम्मद शमी , मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप).