रणजी ट्रॉफीतील ‘त्या’ घटनेमुळे कोलकाता नाईट रायडर्सचं टेन्शन वाढलं, पुन्हा तसंच झालं तर…
आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी फक्त एका आठवड्याचा कालावधी शिल्लक असून कोलकाता नाईट रायडर्सचं टेन्शन वाढलं आहे. रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना यासाठी कारणीभूत ठरला आहे. विदर्भाला पराभूत करत स्पर्धा मुंबईने जिंकली पण कोलकाता नाईट रायडर्सची धाकधूक वाढली.
1 / 7
रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात पार पडला. हा सामना मुंबई 169 धावांनी जिंकला. तसेच स्पर्धेत 42व्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेत विदर्भाने कडवी झुंज दिली पण मुंबईच्या गोलंदाजानंतर शेवटच्या क्षणी काही एक चाललं नाही.
2 / 7
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्याचं आव्हान करताच श्रेयस अय्यर मैदानात उतरला होता. मुंबईकडून अंतिम सामन्यात खेळताना श्रेयस अय्यरने पहिल्या डावात 7 आणि दुसऱ्या डावात 95 धावांची खेळी केली. मात्र या सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा पाठदुखीचा त्रास सुरु झाला आहे. त्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
3 / 7
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आलं आहे. अशाच अजिंक्य रहाणे दुखापतग्रस्त असल्याने फ्रेंचायसीचं टेन्शन वाढलं आहे. गेल्या पर्वात पाठदुखीच्या त्रासामुळे श्रेयस अय्यर खेळला नव्हता.
4 / 7
रिपोर्ट्सनुसार, अय्यरच्या पाठीच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या वर्षी पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि आता पुन्हा तिथेच दुखापत सुरु झाली आहे.
5 / 7
दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना अय्यर मुकण्यीची शक्यता आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे. रणजी ट्रॉफीच्या चौथ्या दिवशी श्रेयस अय्यर थेट स्कॅनिंगसाठी रुग्णालयात गेला होता. 95 धावांच्या खेळीत त्याने दोनचा फीजियो ट्रिटमेंटही घेतली होती.
6 / 7
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना 23 मार्च रोजी ईडन गार्डनवर सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. आता या सामन्यात श्रेयस अय्यस खेळतो नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
7 / 7
आयपीएल 2022 च्या लिलावत शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटी रुपये खर्च करून श्रेयसला संघात घेतलं होतं. मात्र अय्यर 2023 च्या पर्वात खेळलाच नाही. त्यामुळे नितीश राणाने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.