टीम इंडियाच्या युवा आणि स्टार ओपनर बॅट्समन शुबमन गिल याने बांगलादेश विरुद्ध शतक ठोकलं. शुबमनने 133 बॉलमध्ये 121 धावांची खेळी केली. शुबमनने यासह मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
शुबमन 2023 या सुरु वर्षात आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं ठरणारा फलंदाज ठरला आहे. शुबमनने याबाबतीत विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
शुबमनने 2023 या वर्षात आतापर्यंत एकूण 5 आंतरराष्ट्रीय शतक ठोकली आहेत. तर शुबमनचं बांगलादेश विरुद्ध ठोकलेलं शतक हे त्याच्या वनडे करिअरमधील सहावं शतक ठरलं.
विराट कोहली याने आतापर्यंत या वर्षात 5 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत. त्यामुळे आता विराटच्या पुढील शतकाची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.
तर 2023 वर्षात आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा हा तिसऱ्या स्थानी आहे. टेम्बाने आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत.