IND vs AUS : वनडे वर्ल्डकपपूर्वी शुबमन गिल फॉर्मात, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ठोकलं अर्धशतक
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 50 षटकात सर्व गडी बाद 276 धावा केल्या. विजयासाठी 277 धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. या सामन्यात शुबमन गिलने अर्धशतक झळकावलं.
1 / 6
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 277 धावांचं आव्हान गाठण्यासाठी शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या गड्यासाठी या दोघांनी शतकी भागीदारी केली.
2 / 6
शुबमन गिल याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. 37 चेंडूत अर्धशतक झळकावलं. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना षटकार ठोकला आणि 50 धावा पूर्ण केल्या.
3 / 6
शुबमन गिल याने वनडे कारकिर्दितील नववं अर्धशतक झळकावलं. शतकाकडे वाटचाल करत असताना झम्पाने तंबूचा रस्ता दाखवला. गिलने 63 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या.
4 / 6
ऋतुराज गायकवाड याने 60 चेंडूत 50 धावा करत वनडेतील पहिलं अर्धशतक झळकावलं. यात 7 चौकारांचा समावेश होता.
5 / 6
वनडे सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या झाली आहे. धवन-रोहित (193), धवन-रोहित (178), रोहित-धवन (176), सचिन-गांगुली (175), ऋतुराज-गिल (142) अशी भागीदारी आहे.
6 / 6
शुबमन गिल याने उर्वरित दोन वनडे सामन्यात जबरदस्त कामगिरी केली तर आयसीसी रँकिंगमध्ये फायदा होईल. सध्या गिल दुसऱ्या स्थानावर आहे. गिल आणि बाबर यांच्यात काही गुणांचा फरक आहे.