टीम इंडियाच्या सहा क्रिकेटपटूंचा एकाच दिवशी वाढदिवस, बुमराहसह कोण आहेत यादीत वाचा
Happy Birthday : आज भारतीय क्रिकेट संघाच्या सहा खेळाडूंचा वाढदिवस आहे. एकाच दिवशी दिग्गज क्रिकेटपटूंचा वाढदिवस असल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, करुण नायर, आरपी सिंग आणि सुयश प्रभुदेसाई यांचा आज वाढदिवस आहे.
1 / 8
भारतीय क्रिकेटसाठी 6 डिसेंबर हा दिवस खूपच खास आहे. कारण आज सहा खेळाडू आपला वाढदिवस साजरा करत आहेत. या क्रिकेटपटूंमध्ये जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, करुण नायर, आरपी सिंग आणि युवा क्रिकेटर सुयश प्रभुदेसाई यांचा समावेश आहे.
2 / 8
जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा आपला वाढदिवस ऑस्ट्रेलियात साजरा करत आहेत. तर श्रेयस अय्यर देशांतर्गत सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत खेळत आहे. श्रेयस अय्यरसाठी हा वाढदिवस खूपच खास आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात पंजाब किंग्सने त्याच्यासाठी 26.75 कोटी रुपये मोजले.
3 / 8
पर्थमध्ये बॉर्डर-गावस्कर मालिकेत टीम इंडियाला विजय मिळवून देणारा जसप्रीत बुमराह यावेळी ऑस्ट्रेलियात 31 वा वाढदिवस साजरा करणार आहे. पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत बुमराहने संघाचं नेतृत्व केलं होतं. बुमराहने 8 विकेट घेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.
4 / 8
टीम इंडियासोबतच ऑस्ट्रेलियातील रवींद्र जडेजाही आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. पहिल्या कसोटीत जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. तर दुसऱ्या कसोटी सामन्यातही डावलण्यात आलं आहे.
5 / 8
श्रेयस अय्यर 30वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला आयपीएल 2025 मेगा लिलावात 26.75 कोटी रुपये मिळाले आहेत. सैयद मुश्ताक अली स्पर्धेतही अय्यर चांगली कामगिरी करत आहे. तसेच टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.
6 / 8
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग देखील 6 डिसेंबर रोजी आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2007 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात आरपी सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
7 / 8
करुण नायरही 34 वर्षांचा झाला आहे. टीम इंडियात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायरला संघात फारशी संधी मिळाली नाही. यावेळी मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने करुणला स्थान दिले आहे.
8 / 8
देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळणारा सुयश प्रभुदेसाई आज 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. आतापर्यंत सुयशला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण त्याने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी काही सामने खेळले आहेत.