आयपीएल 2024 स्पर्धेत एक दोन नव्हे तर सहा संघांनी बदलले कर्णधार, जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी बरीच उलथापालथ पाहायला मिळाली आहे. खेळाडूंच्या आदलाबदलीसह कर्णधारही बदलले आहेत. या स्पर्धेत एक दोन नव्हे तर एकूण सहा नवे कर्णधार दिसणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाची धुरा कोणाकडे आहे ते
1 / 7
आयपीएल स्पर्धा होण्यापूर्वीच फ्रेंचायसींनी भविष्याचा वेध घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबद, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार बदलला आहे.
2 / 7
आयपीएल स्पर्धेच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्सने आपला कर्णधार बदलला आहे. चेन्नई सुपर किंग्सने नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडून ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवलं आहे. या स्पर्धेपूर्वी कर्णधार बदलेला सहावा संघ आहे.
3 / 7
आयपीएलच्या 17 व्या पर्वापूर्वी कर्णधार बदलणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ आहे. मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघात घेतलं. इतकंच काय तर रोहित शर्माकडील कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवलं.
4 / 7
मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला नेतृत्व सोपवताच गुजरात टायटन्सला कर्णधारपदाची धुरा कोणाकडे सोपवणं गरजेचं होतं. गुजरात टायटन्सने ही पोकळी भरून काढण्यासाठी शुबमन गिलकडे सोपवली.
5 / 7
सनरायझर्स हैदराबाद हा कर्णधार बदलणारा हा तिसरा संघ ठरला. मिनी लिलावात 20.50 कोटी खर्च करून पॅट कमिन्सला संघात घेतलं तेव्हाच याची कल्पना आली होती. एडन मार्करमकडून कर्णधारपद काढून ते पॅट कमिन्सकडे सोपवलं.
6 / 7
मागच्या पर्वात अपघातामुळे ऋषभ पंतला खेळता आलं नव्हतं. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व डेविड वॉर्नरकडे सोपवलं होतं. त्यानंतरही ऋषभ पंतबाबत साशंकता होती. मात्र आता ऋषभ पंत फिट अँड फाईन झाला आहे. त्यामुळे कर्णधारपद पुन्हा एकदा त्याच्याकडे सोपवलं आहे.
7 / 7
ऋषभ पंतप्रमाणे श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे मागच्या पर्वात खेळला नव्हता. आता श्रेयस अय्यरने कमबॅक केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याकडे धुरा सोपवण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सची धुरा त्याची हाती असणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत ही धुरा राणाकडे होती.