पाकिस्तान क्रिकेट टीमच्या श्रीलंका दौऱ्याला रविवार 16 जुलैपासून सुरुवात होतेय. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकूण 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
पाक विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला सामना हा 16 जुलै ते 20 जुलै दरम्यान गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
दिमुथ करुणारत्ने हा या मालिकेत श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर पाकिस्तानचं कर्णधारपद बाबर आझम सांभाळणार आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ या मालिकेतून आपल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 फेरीला सुरुवात करणार आहेत.
कसोटी मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), सदीरा समरविक्रमा (विकेटकीपर), निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, धनंजया डी सिल्वा, पाथुम निसांका, कामिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रबाथ जयसूर्या, प्रवीण जयविक्रमा, कसून राजिथा, दिलशान मधुशंका, विश्व फर्नांडो आणि लक्षिता मानासिंघे.
टेस्ट सीरिजसाठी पाकिस्तान टीम | बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), अब्दुल्ला शफीक, मोहम्मद हुरैरा, शान मसूद, सौद शकील, आगा सलमान, मोहम्मद नवाज, आमेर जमाल, अबरार अहमद, हसन अली, नसीम शाह, नौमान अली, शाहीन आफ्रिदी, इमाम- उल-हक आणि सरफराज अहमद.