अर्धशतकी खेळी केल्यानंतर स्मृती मंधानाला आयसीसीकडून गिफ्ट, झालं असं की..

| Updated on: Dec 24, 2024 | 5:56 PM

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यातही स्मृती मंधानाने जबरदस्त खेळी केली. टी20 नंतर वनडे मालिकेत सलग दुसरं अर्धशतक ठोकलं आहे. टी20 मधील सलग तीन अर्धशतकांचा तिला फायदा झाला आहे. वनडेतही तिला तिच्या कामगिरीचं फळ मिळणार आहे.

1 / 5
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु असून भारताने विजयासाठी 50 षटकात 5 गडी गमवून 358 धावा केल्या आहेत. तसेच विजयासाठी 359 धावांचं आव्हान दिलं आहे. स्मृती मंधानाने या सामन्यात 53 धावांची खेळी केली. यासह वनडे मालिकेतील तिचं सलग दुसरं अर्धशतक आहे.

2 / 5
स्मृती मंधाना जबरदस्त फॉर्मात आहे. टी20 असो की वनडे मालिका तिने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टी20 मालिकेत सलग तीन अर्धशतकं झळकावली होती. त्याचं बक्षीस तिला आयसीसीकडून मिळालं आहे.

3 / 5
आयसीसीने महिलांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात स्मृती मंधानाला जबर फायदा झाला आहे. टी20 क्रमवारीत तिने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. स्मृतीने 753 गुण असून ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीचे 757 गुण आहेत.  स्मृती मंधाना याआधी टी20 क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होती.

4 / 5
दुसरीकडे, वनडे क्रमवारीतही स्मृती मंधानाला फायदा होणार यात काही शंका नाही. वनडे सामन्यात मंधानाचे गुण 739 आहेत. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड 773 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे.

5 / 5
एकदिवसीय क्रमवारीत नंबर 1 बनण्याची मोठी संधी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात  91 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यात 47 चेंडूत 53 धावा केल्या. अशा स्थितीत स्मृती मंधाना पुढील क्रमवारीत एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज बनू शकते.