World Cup 2023 मध्ये सर्वाधिक शतक क्विंटन डी कॉकच्या नावावर, विराट कितव्या स्थानी?
Most Century In World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत एकूण 6 फलंदाजांनी किमान 1 शतक ठोकलंय. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक हा आघाडीवर आहे.
1 / 5
दक्षिण आफ्रिकाचा स्टार, अनुभवी आणि ओपनर बॅट्समन क्विंटन डी कॉक याचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे. क्विंटन वर्ल्ड कपनंतर निवृ्त्त होणार आहे. त्याआधी क्विंटनने 13 व्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये 4 शतकांच्या मदतीने 55 धावा केल्या आहेत.
2 / 5
13 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांबाबत दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा युवा रचिन रवींद्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. रचिनने 8 सामन्यांमध्ये 3 शतकांसह 523 धावा केल्या आहेत.
3 / 5
ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने 2 शतकं ठोकली आहेत. मॅक्सवेलने 8 सामन्यांमध्ये 397 धावा केल्या आहेत.
4 / 5
टीम इंडियाचा विराट कोहली 2 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने 8 सामन्यात 543 धावा केल्या आहेत.
5 / 5
दक्षिण आफ्रिकेचा रसी वॅन डेर डुसेन याने 8 सामन्यांमध्ये 2 शतकं ठोकली आहेत. रसीने 45.75 सरासरी आणि 90.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.