IPL 2024: 17 व्या मोसमातील सिक्सर किंग कोण? अव्वल स्थानी हा फलंदाज
Most Sixes in IPL 2024: आयपीएलच्या 17 व्या मोसमात भारतीय अनकॅप्ड फलंदाजांनी आपल्या विस्फोटक बॅटिंगने धमाका केला. केकेआरने ही ट्रॉफी जिंकली. मात्र या हंगामात सर्वाधिक सिक्सचा विक्रम कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहे? जाणून घ्या.
1 / 7
आयपीएलच्या 17 व्या मोसमाची सांगता रविवारी 26 मे रोजी झाली. कोलकाता हैदराबादवर मात करत तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरली. त्यांनतर आपण या हंगामात सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि हेन्रिक क्लासेन हे दोघे संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत.
2 / 7
उपविजेत्या सनरायजर्स हैदराबाजचा फलंदाज हेन्रिक क्लासेन याने 16 सामन्यांमध्ये 479 धावा केल्या. क्लासेनने या दरम्यान 38 सिक्स फटकावले. हेन्रिक क्लासेन सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
3 / 7
विराट कोहली ऑरेंज कॅप विजेता ठरला. विराटने 15 सामन्यांमध्ये एकूण 741 धावा केल्या. विराटने 38 सिक्स या हंगामात ठोकले. विराटने हेन्रिकच्या तुलनेत 1 सामना कमी खेळून बरोबरीचे सिक्स ठोकले आहेत.
4 / 7
लखनऊ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन याने 14 सामन्यांमध्ये 449 धावा केल्या. पूरनने या एकूण धावांदरम्यान 36 सिक्स लगावले. निकोलस पूरन सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
5 / 7
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान पराग याने 15 सामन्यांमध्ये 573 धावा ठोकल्या. रियानच्या नावे 33 षटकारांची नोंद आहे.
6 / 7
कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराउंडर सुनील नरीन याने 14 सामन्यांमध्ये 488 धावा केल्या. नरीन आणि रियान हे दोघे 33 सिक्सह संयुक्तरित्या चौथ्या स्थानी आहेत.
7 / 7
तर उपविजेत्या हैदराबादचा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा हा या हंगामातील सिक्सर किंग ठरला आहे. अभिषेकने 16 सामन्यांमध्ये 484 धावा केल्या. अभिषेकने या दरम्यान एकूण 42 सिक्स ठोकले.