भारताला 48 तासात दुसऱ्यांदा गूड न्यूज मिळाली आहे. मुरली श्रीशंकर याच्यानंतर आता मराठमोळा बीडचा अविनाश साबळे याने टोकियो ऑल्मिपिकसाठीचं तिकीट कन्फर्म केलं आहे.
पोलंडमधील सिलेसिया इथे डायमंड लीग स्पर्धेत अविनाश साबळे याने मेन्स 3000 मीटर स्टीपलचेस इव्हेंटमध्ये सहावं स्थान मिळवलं. अविनाश याने 3000 मीटर हे अंतर 8.11.63 इतक्या वेळेत पूर्ण करत 6 वं स्थान निश्चित केलं.
अविनाशला ऑल्मिपिक क्वालिफाय करण्यासाठी 8.15.00 इतक्या वेळेत स्पर्धा संपवायची होती. मात्र अविनाशने त्याआधी ही स्पर्धा पूर्ण केली आणि भारताला गूड न्यूज दिली.
अविनाशला आपला स्वत:चा नॅशनल रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी होती, मात्र यात तो अपयशी ठरला. अविनाश याने गेल्या वेळेस कॉमनवेल्थमध्ये 8.11.20 वेळेत स्पर्धा संपवली होती.
दरम्यान भारतासाठी गेल्या 48 तासांमध्ये दोघांनी ऑल्मिपिकचं तिकीट मिळवलं. अविनाश याच्याआधी लांब उडीत मुरली श्रीशंकर याने 15 जुलै रोजी एशियन अॅथेलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावलं होतं. मुरली यासह पॅरिस ऑल्मिपिकसाठी पात्र ठरला.