सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या प्रदर्शनावर काढली भडास, म्हणाले; “तुम्ही त्या संघांना…”

| Updated on: Jun 13, 2023 | 5:06 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण क्रीडाप्रेमींच्या पदरी निराशाच पडली. आता भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साठी सज्ज झाला असून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळणार आहे.

1 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. फॉर्मात असलेले खेळाडूही साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. एकीकडे, पराभवाचं मंथन सुरु असताना टीम इंडियाच्या पुढील मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

2 / 6
भारतीय संघाचा पुढचा दौरा वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या मालिकेत टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळणार आहे.

3 / 6
वेस्ट मालिकेपूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभव जिव्हारी लागला असून त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे.

4 / 6
भारतीय संघ पुढच्या मालिकेत वेस्ट इंडिजला पराभूत करेल. कारण तो कमकुवत संघ आहे. तुम्ही त्यांना व्हाईट वॉश द्याल किंवा मालिका जिंकाल. पण कमकुवत संघांना पराभूत करून तुम्ही महान होत नाहीत.

5 / 6
टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. ही मालिका टीम इंडिया नक्कीच जिंकेल, असं भाकीत गावसकर यांनी आधीच केलं आहे.

6 / 6
कमकुवत संघांना नाही तर बलाढ्य संघाला पराभूत संघ महान होतो, असंही सुनील गावस्कर यांनी पुढे सांगितलं.