अब की बार 300 पार…! सनरायझर्स हैदराबादच्या ट्रेव्हिस हेडने सांगितलं स्पर्धेतलं लक्ष्य

| Updated on: Mar 24, 2025 | 4:47 PM

सनरायझर्स हैदराबादचा बॅटिंग लाईनअप पाहिला तर गोलंदाजांचा थरकाप उडणार हे निश्चित आहे. एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. एक गेला की दुसरा तयारच असतो. चेंडू आरपार मारण्याची ताकद पाहता गोलंदाजांचं करिअर संकटात आलं आहे. पहिल्याच सामन्यात राजस्थान विरुद्ध खेळताना सनरायझर्स हैदराबादने 286 धावा केल्या. त्यामुळे आता 300 धावांचा आकडा सहज शक्य असल्याचं म्हणणं आहे.

1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांची पिसं काढली. 20 षटकात 6 गडी गमवून 286 धावा केल्या. या स्पर्धेतील हा तिसरा 250 पार स्कोअर आहे. आता या स्पर्धेत 300 धावांचं लक्ष्य असल्याचं ट्रेव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन याने सांगितलं.

2 / 5
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 286 धावांचा मोठा स्कोर केला. या हंगामात पहिल्याच सामन्यात हैदराबादने 300 धावा केल्या असत्या. पण 14 धावा कमी पडल्या. पण आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम रचला आहे.

3 / 5
आयपीएल 2024 स्पर्धेत बेंगळुरूमध्ये झालेल्या आरसीबी विरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 287 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर आहे. त्यामुळे "अब की बार 300 पार" हे ब्रीदवाक्य खरं ठरेल असा विश्वास सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना आहे.

4 / 5
हैदराबादने आरसीबीविरुद्ध 287, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 286, मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 266 धावा केल्या आहेत. आता सनरायझर्स हैदराबादने 300 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

5 / 5
ट्रेव्हिस हेड म्हणाला की, 'आमची फलंदाजी फळी खूप मजबूत आहे आणि आम्हाला निश्चितच 300 धावांचा टप्पा गाठण्याची चांगली संधी आहे." यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेननेही सांगितले की, यावेळी तीनशेहून अधिक धावा करण्याचा विश्वास आहे. फलंदाजांचा आत्मविश्वास पाहता या हंगामात 300 पेक्षा जास्त धावा करण्याची शक्यता आहे.' (फोटो- टीव्ही 9 कन्नड आणि ट्वीटर)