Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादव वनडे वर्ल्डकपमध्ये फ्लॉप, तरी टी20 मालिकेची धुरा
IND vs AUS T20I Series | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 1 कर्णधार आणि 2 उपकर्णधार नियुक्त करण्यात आले आहेत.
1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करूनही सूर्यकुमार यादव याच्याकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी नेतृत्व देण्यात आलं आहे. मोक्याच्या क्षणी गरज असताना सूर्यकुमार यादव फ्लॉप ठरला होता. मात्र आता सूर्याकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेची धुरा त्याच्याकडे सोपवली आहे.
2 / 6
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या पाच सामन्यांची टी20 मालिका 23 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
3 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताच्या स्वप्नांवर पाणी फेरलं होतं. अंतिम सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादव याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. 28 चेंडूत 18 धावा करून बाद झाला.
4 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या चार सामन्यात सूर्यकुमार यादवला खेळण्याची संधी मिळाली नाही. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने सूर्यकुमारला संधी मिळाली. न्यूझीलंडविरुद्ध 4 चेंडूत 2 धावा करून रनआऊट झाला. इंग्लंड विरुद्ध 47 चेंडूत 49 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध 9 चेंडूत 12 धावा केल्या.
5 / 6
दक्षिण अफ्रिकेविरुद्द 14 चेंडूत 22 धावा केल्या. नेदरलँड विरुद्ध 2 धावा करून नाबाद राहिला. उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 1 धाव करून तंबूत परतला. तर अंतिम सामन्यात 28 चेंडूत 18 धावा करून परतला.
6 / 6
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.