सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात मानाचा तुरा, चार षटकार ठोकताच नोंदवला असा विक्रम
टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव याची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव याने 42 चेंडूत 190 च्या स्ट्राईक रेटने 80 धावा केल्या. तसेच टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. या सामन्यात चार षटकार ठोकताच सूर्यकुमार यादव याने एका विक्रमाची नोंद केली आहे.
1 / 8
सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या शैलीला साजेशी खेळी केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 42 चेंडूत 190 च्या स्ट्राईक रेटने 80 धावा केल्या. या खेळीत त्याने चार उत्तुंग षटकार ठोकले आणि खास क्लबमध्ये एन्ट्री केली.
2 / 8
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात चार षटकार ठोकत मधल्या फळीतील फलंदाज म्हणून 100 षटकारांचं शतक पूर्ण केलं आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू आहे. सूर्यकुमार यादव याच्यापूर्वी ही कामगिरी तीन खेळाडूंनी केली आहे.
3 / 8
इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनने 107 डावात 120 षटकार ठोकले आहेत. मधल्या फळीत उतरत त्याने संघाला बळ अनेकदा बळ दिलं आहे. या कामगिरीसह तो यादीत पहिल्या स्थानावर आहे.
4 / 8
रनमशिन्स म्हणून ख्याती असलेला विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याने 98 डावात 106 षटकार ठोकले आहेत.
5 / 8
क्षिण अफ्रिकेचा डेव्हिड मिलर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. डेव्हिड मिलरने 98 डावात 105 षटकार ठोकले आहेत.
6 / 8
सूर्यकुमार यादव या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये मधल्या फळीत खेळताना 47 डावांमध्ये 100 षटकार ठोकले आहेत.
7 / 8
टी-20 फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार चार डावात सलामीवीर म्हणून उतरला होता. तेव्हा त्याने 33.75 च्या सरासरीने 135 धावा केल्या आहेत. त्यात आठ षटकारांचा समावेश आहे. सुर्याने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 16 अर्धशतके झळकावली आहेत.
8 / 8
सूर्यकुमार यादवने भारतीय कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला. सूर्याने 80 धावांची खेळी करत केएल राहुलला मागे टाकले आहे. केएल राहुलने कर्णधार म्हणून अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 सामन्यात 62 धावा केल्या होत्या.