ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 5 गडी गमवून 399 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी 400 धावांचं आव्हन दिलं आहे. या सामन्यात शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी जबरदस्त खेळी केली.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मार्च महिन्यातील वनडे सामन्यात सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव याच्यावर टीका झाली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादव याने वनडे वर्ल्डकपपूर्वीच्या मालिकेत जबरदस्त कमबॅक केलं आहे.
सूर्यकुमार यादव याने 24 चेंडूत अर्धशतक झळकावलं. यात 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सूर्यकुमार यादव याचं दुसरं अर्धशतक आहे. सूर्यकुमार यादव याने 37 चेंडूत 72 धावा केल्या.
सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. कॅमरोन ग्रीनच्या गोलंदाजीवर सलग 4 षटकार ठोकले. सूर्यकुमार यादव याचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात वेगवान अर्धशतक आहे. 24 चेंडूत त्याने अर्धशतक झळकावलं. विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 27 चेंडूत हे अर्धशतक झळकावलं होतं.
सूर्यकुमार यादव वनडे फॉर्मेटमध्ये वारंवार फेल जात होता. मात्र तरीही कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याच्या विश्वास दाखवला. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप संघात स्थान मिळालं आहे. ही निवड योग्य असल्याचं सूर्यकुमार यादव याने सिद्ध करून दाखवलं आहे.
शुबनम गिल आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 200 धावांची भागीदारी केली. तर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी 53 धावांची भागीदारी केली.