सूर्यकुमार यादव अफगाणिस्तानविरुद्धची टी20 मालिका खेळणार नाही, कारण…
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. पण या मालिकेत सूर्यकुमार यादव खेळणार नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. मालिकेत का खेळणार नाही ते जाणून घ्या.
1 / 6
हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्याने टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 4-0 ने जिंकली. त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यात मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात यश आलं. असं असताना सूर्यकुमार यादव अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळणार नाही.
2 / 6
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात सूर्यकुमार यादव याला दुखापतझाली होती. त्याला ग्रेड 2 ची जखम असून त्याला 7 आठवड मैदानापासून दूर राहावं लागणार आहे. भारतात परतल्यानंतर त्याच्या गुडघ्याचं स्कॅनिंग करण्यात आलं आणि त्याच्या दुखापतीची तीव्रता समोर आली.
3 / 6
सूर्यकुमार यादव आता सात आठवडे क्रिकेटपासून दूर असेल आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात फिट अँड फाईन होईल. त्यामुळे 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेला मुकणार आहे.
4 / 6
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो काही काळ मैदानाबाहेर बसला होता. तसेच उपकर्णधार रवींद्र जडेजाला जबाबदारी सांभाळावी लागली होती.
5 / 6
हार्दिक पांड्याही दुखापतग्रस्त असून अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी फिट होईल असा अंदाज आहे. तसं झालं तर अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे असेल.
6 / 6
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा जून महिन्यात होणार आहे. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेत महत्त्वाच्या खेळाडूंचं दुखापतग्रस्त होणं फ्रेंचायसींना महागात पडणार आहे. त्यामुळे सहा महिने खेळाडूंना आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावं लागणार आहे.