6, 6, 6, 6, 4, 4…T20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम, धावसंख्या वाचून तुम्हीही तसंच काहीसं म्हणाल…
इंग्लंडमधील टी 20 लीगमध्ये एका नव्या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. सामन्यात अक्षरश: षटकार आणि चौकारांच्या वर्षावर झाला. 20 षटकानंतर झालेली धावसंख्या वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
1 / 5
सस्सेक्स सेकंड इलेव्हन विरुद्ध मिडलसेक्स सेकंड इलेव्ह यांच्यात हा सामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून सस्सेक्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20 चॅम्पियनशिप लीगमध्ये सस्सेक्स संघाने 324 धावा करत नवा इतिहास रचला आहे.
2 / 5
मिडलसेक्स सेकंड इलेव्हन विरुद्ध झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सस्सेक्स सेकंड इलेव्हन संघाने स्फोटक फलंदाजी केली. प्रतिस्पर्धी गोलंदाजांविरुद्ध कर्णधार रवी बोपाराने धडाकेबाज फलंदाजी करत 12 उत्तुंग षटकार आणि 14 चौकार ठोकले.
3 / 5
रवी बोपाराने अवघ्या 49 चेंडूत 144 धावा केल्या. दुसरीकडे, टॉम अलसोपने 27 चेंडूत 55 धावा केल्या. 20 षटकांच्या अखेरीस सस्सेक्स संघाने 7 गडी गमावून 324 धावा केल्या.
4 / 5
325 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मिडलसेक्सचा डाव अवघ्या 130 धावांत आटोपला. यासह सस्सेक्स संघाने 192 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
5 / 5
सस्सेक्स सेकंड इलेव्हन इंग्लिश काउंटी टी20 क्रिकेटमध्ये 300 हून अधिक धावा करणारा पहिला संघ ठरला. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये 300 धावांचा नवा विश्वविक्रमही खास आहे.