T20 Ranking : विराटनं बाबर आझमचं स्थान हिसकावलं, 14 फलंदाजांना मागे टाकलं

| Updated on: Sep 14, 2022 | 4:31 PM

ICC T20 क्रमवारीत विराट कोहलीनं जबरदस्त झेप घेतली आहे. तर यातून बाबर आझमचा चांगलाच धक्का बसलाय.

1 / 5
सध्या सगळीकडे विराटच विराट आहे. आणखी एक बातमी त्याच्यासंदर्भातच आली आहे. विराट कोहलीनं ICC T20 क्रमवारीत जबरदस्त झेप घेतली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावणाऱ्या विराटनं आता 14 फलंदाजांना मागे टाकून 15व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

2 / 5
आशिया कपपूर्वी विराट कोहली 33 व्या क्रमांकावर होता. मधल्या स्पर्धेत तो 29 व्या क्रमांकावर पोहोचला होता आणि आता त्याचं T20 रँकिंग 15वर गेलंय. विराट कोहली अनेक वर्षांपासून टी-20 चा नंबर 1 फलंदाज होता आणि आता तो पुन्हा जोमात खेळतोय. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी असेल.

3 / 5
बाबर आझमबद्दल बोलायचं झालं तर आशिया कप सुरू होण्यापूर्वी तो नंबर 1 फलंदाज होता. पण मधल्या टूर्नामेंटमध्ये तो 2व्या क्रमांकावर आला आणि आता तो 3 व्या क्रमांकावर घसरला आहे. बाबरच्या जागी आता दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.

4 / 5
भारताकडून सध्या फक्त एकच फलंदाज टी-20 क्रमवारीत अव्वल 10मध्ये आहे. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, तर रोहित शर्मा 14व्या आणि विराट कोहली 15व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार 7व्या क्रमांकावर आहे ज्याने एक स्थान गमावलंय.

5 / 5
भारतीय महिला फलंदाजांमध्ये स्मृती मानधना चौथ्या क्रमांकावर आहे. शेफाली वर्मा टी-20 क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. जेमिमाह रॉड्रिग्ज 10व्या स्थानावर आहे. हरमनप्रीत कौर 15 व्या स्थानावर आहे.