T20 World Cup 2024 : सेमीफायनल भारत कशी गाठणार? तीन संघांविरुद्ध कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या

| Updated on: Jun 18, 2024 | 2:59 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार संपला असून आता सुपर 8 फेरीचे वेध लागला आहे. या फेरीतून उपांत्य फेरीचा मार्ग जाणार आहे. त्यामुळे सुपर आठ फेरीतील तीन सामने प्रत्येक संघासाठी महत्त्वाचे आहे. या फेरीत चार संघांचा प्रवास थांबणार आहे तर चार पुढच्या प्रवासासाठी जाणार आहे. चला जाणून टीम इंडिया कोणत्या संघांसोबत लढणार आहे आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड काय सांगतो?

1 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत टीम इंडियाची तीन संघांशी लढत होणार आहे. टीम इंडिया 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध, 22 जूनला बांगलादेशविरुद्ध आणि 24 जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढणार आहे.

2 / 6
टी20 क्रिकेटमध्ये भारत अफगाणिस्तान नवव्यांदा भिडणार आहेत. या आधी 8 पैकी 6 सामने भारताने जिंकले आहेत. 1 सामना बरोबरीत सुटला आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे. म्हणजेच अफगाणिस्ताने भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही.

3 / 6
सुपर 8 फेरीतील भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी होणार आहे. टी20 क्रिकेटमधील दोन्ही संघातील हा 14 वा सामना असेल. भारताने यापूर्वी 13 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे.

4 / 6
सुपर 8 फेरीतील भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा 32वा सामना असेल. यापूर्वी झालेल्या 31 सामन्यात भारताने 19, तर ऑस्ट्रेलियाने 11 सामने जिंकले आहेत. तर एक सामना निकालाविना संपला आहे.

5 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बोलायचं तर हे दोन्ही संग पाचवेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 3, तर ऑस्ट्रेलियाने 2 वेळा विजय मिळवला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हा सामना वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे.

6 / 6
वेस्ट इंडिजमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभं ठाकण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी खेळलेला एकमेव सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे सुपर 8 फेरीत भारताची कसोटी लागणार आहे.