IND vs BAN : रोहित शर्माने ख्रिस गेलच्या नावावर असलेला महारेकॉर्ड मोडला, काय केलं ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामना सुरु आहे. टीम इंडियाने या सामन्यात अपेक्षेप्रमाणे फलंदाजी केली आहे. विकेट पडल्या तरी स्कोअरबोर्डवर बऱ्यापैकी धावा लागल्या आहेत. रोहित शर्माने 11 चेंडूत 23 धावांची खेळी केली. मात्र यात त्याने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.