T20 World Cup 2024 : अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणार तोच ठरणार विजेता? मागची आकडेवारी वाचा
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. दोन्ही संघ जेतेपदासाठी सज्ज आहेत. आतापर्यंत टी20 वर्ल्डकपचे 8 पर्व पार पडले आहेत. या आठ पर्वातील अंतिम फेरीत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरला आहे. चला जाणून घेऊयात आतापर्यंत काय घडलं ते
1 / 10
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांनी इथपर्यंतच्या प्रवासात एकही सामना गमावलेला नाही. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. मागच्या आठ पर्वात तर असंच दिसून आलं आहे. टी20 वर्ल्डकपचं हे नववं पर्व आहे.
2 / 10
टी20 वर्ल्डकपच्या आठ पर्वात नाणेफेक जिंकणारा संघ सात वेळा विजयी ठरला आहे. तर प्रथम गोलंदाजी करणारा संघ सहा वेळा विजयी ठरला आहे. तर प्रथम फलंदाजी करताना दोन संघ विजयी ठरले आहेत.
3 / 10
2007 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने नाणेफेक जिंकली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमवून 157 धावा केल्या. पाकिस्तानचा डाव 152 धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना 5 धावांनी जिंकला.
4 / 10
दुसर्या पर्वात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी घेतली. श्रीलंकेने 20 षटकांत 6 गडी गमावून 138 धावा केल्या. पाकिस्तानने हा सामना 8 विकेटने जिंकून विश्वचषक जिंकला.
5 / 10
तिसऱ्या पर्वात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 147 धावा केल्या. इंग्लंडने हे आव्हान 3 गडी गमवून पूर्ण केलं.
6 / 10
चौथ्या पर्वात वेस्ट इंडिज आणि श्रीलंका अंतिम फेरीत पोहोचले होते. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 गडी गमावून 137 धावा केल्या. पण श्रीलंकेचा संघ 18.4 षटकांत 101 धावांत गारद झाला.
7 / 10
पाचव्या पर्वात श्रीलंका आणि भारत आमनेसामने आले. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने श्रीलंकेसमोर 130 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेने 17.5 षटकांत 4 गडी गमावून हे आव्हान गाठलं.
8 / 10
सहाव्या पर्वात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. इंग्लंडने 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावा केल्या. वेस्ट इंडिजने 19.4 षटकांत 6 गडी गमवून हे आव्हान गाठलं आणि जेतेपदावर नाव कोरलं.
9 / 10
सातव्या पर्वात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकांत 4 गडी गमावून 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 18.5 षटकांत 2 गडी गमावून 173 धावा केल्या.
10 / 10
आठव्या पर्वात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. पाकिस्तानने 20 षटकात 8 गडी गमावून 137 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 19 षटकांत 5 गडी गमावून 138 धावा केल्या.