न्यूझीलंडने आतापर्यंत कमावलं आणि यंदाच्या वर्ल्डकपमध्ये गमावलं, 1987 नंतर पहिल्यांदाच असं घडलं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. या फेरीतून दिग्गज संघांना गाशा गुंडाळावा लागला आहे. श्रीलंकेनंतर न्यूझीलंड हा दुसरा दिग्गज संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अजून दोन सामने शिल्लक असूनही न्यूझीलंडच्या पदरी निराशा पडली आहे.
1 / 6
साखळी फेरीतच दिग्गज न्यूझीलंड संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या संघाची साखळी फेरीतच दुर्दशा झाली आहे. न्यूझीलंडने या स्पर्धेत दोन सामने खेळले आणि पराभवाचं तोंड पाहिलं. त्यामुळे जर तरच्या कुठच्याच गणित न्यूझीलंडचा निभाव लागला नाही आणि गाशा गुंडाळावा लागला.
2 / 6
न्यूझीलंडचे साखळी फेरीतील दोन सामने शिल्लक आहेत. मात्र सुपर 8 फेरीसाठीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. न्यूझीलंड संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू असूनही संघावर अशी वेळ ओढावली आहे.
3 / 6
न्यूझीलंडने 1987 नंतर प्रथम आयसीसी स्पर्धेत अशी खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं आहे. यापूर्वी न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धांमध्ये आपलं आव्हान दाखवून दिलं आहे. ग्रुप स्टेजमधून बाहेर पडण्याची न्यूझीलंडची ही पहिलीच वेळ आहे.
4 / 6
क गटात असलेल्या न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने पराभूत केलं. 84 धावांनी सामना गमवण्याची नामुष्की ओढावली. संपूर्ण संघ 15.2 षटकात 75 धावांवर ऑलआऊट झाला. त्यानंतर वेस्ट इंडिजने न्यूझीलंडला पराभवाचं पाणी पाजलं.
5 / 6
क गटात न्यूझीलंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, पापुआ न्यू गिनी आणि युगांडा हे संघ आहेत. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज या गटातून सुपर 8 साठी पात्र ठरले आहेत. तर न्यूझीलंडसह पापुआ न्यू गिनी आणि युगांडाला गाशा गुंडाळावा लागला आहे.
6 / 6
न्यूझीलंडचा संघ यापूर्वी 1987 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीतून बाद झाला होत. 37 वर्षानंतर न्यूझीलंडवर अशी वेळ आली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला असला तरी औपचारीक दोन सामन्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.