अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनिआवर 7 विकेट्सने विजय मिळवत सुपर 8 मध्ये धडक दिली. अफगाणिस्ताच्या विजयासह न्यूझीलंडचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्ठात आलं. न्यूझीलंडची टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी राहिली आहे. मात्र यंदा त्यांना यशस्वी होता आलं नाही.
न्यूझीलंड 2016 पासून 2022 पर्यंत सलग एकूण 3 वेळा नॉकआऊटमध्ये पोहचली आहे. न्यूझीलंड 2016 मध्ये सेमी फायनल, 2021 साली फायनल आणि 2022 मध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचली.
दुर्देवाची बाब अशी की न्यूझीलंडने या स्पर्धेत आतापर्यंत 2 सामनेच खेळलेत आणि त्यांचं आव्हान संपुष्ठात आलं. न्यूझीलंडचे 2 सामने बाकी आहेत. मात्र आता त्या सामन्यात विजय मिळवूनही तसा अर्थ नाही.
न्यूझीलंडला यंदा अफगाणिस्तान विरुद्ध सलामीच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर वेस्ट इंडिजने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 13 धावांनी पराभव केला. तर न्यूझीलंड उर्वरित 2 सामने 15 आणि 17 जून रोजी युगांडा आणि पापुआ न्यू गिनी विरुद्ध खेळणार आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी न्यूझीलंड टीम : केन विलियमसन (कॅप्टन), फिन एलेन, मार्क चॅपमॅन, मायकल ब्रेसवेल, ट्रेन्ट बोल्ट, डेव्हॉन कॉन्व्हे, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊथी, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, मॅट हेनरी, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोढी आणि बेन सियर्स (राखीव)