IND vs PAK : पाकिस्तानला पराभूत करताच टीम इंडिया रचणार इतिहास, काय ते जाणून घ्या

| Updated on: Jun 09, 2024 | 5:04 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. साखळी फेरीतील उलथापालथ पाहता दोन्ही संघांना या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. पण भारताने पाकिस्तानला पराभूत करताच एक विक्रम नावावर होणार आहे. काय ते जाणून घ्या

1 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 19 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे.

2 / 6
टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयर्लंडला पराभूत केलं आहे. तर पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. असं असताना पाकिस्तानला या सामन्यात विजय, तर भारताला या सामन्यात एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

3 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी 6 सामन्यात भारताने तर एका सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे. जर आजच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं तर एक विक्रम प्रस्थापित होईल.

4 / 6
टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात कोणत्याही संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाला सातवेळा पराभूत केलेलं नाही. जर भारताने पाकिस्तानला पराभूत केलं तर नवा विक्रम प्रस्थापित होईल. वर्ल्डकपमध्ये एका टीमविरुद्ध सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित होईल.

5 / 6
भारताने पाकिस्तानला 6 वेळा, पाकिस्तानने बांगलादेशला 6 वेळा, श्रीलंकेने वेस्ट इंडिजला 6 वेळा पराभवाची धूळ चारली आहे. आता या यादीत टीम इंडियाला अव्वल स्थानी बसण्याची संधी आहे.

6 / 6
दोन्ही संघातील खेळाडू  भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, कुलदीप यादव , यशस्वी जयस्वाल.  पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर, इमाद वसीम, अबरार अहमद, सैम अयुब , अब्बास आफ्रिदी