निकोलस पूरनच्या वादळी खेळीने ख्रिस गेलचा विक्रम मोडला, काय ते जाणून घ्या

| Updated on: Jun 18, 2024 | 9:52 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतल्या साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानची पिसं काढली. आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या सामन्यात निकोलस पूरनचं शतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. पण या खेळीत त्याने दोन विक्रम रचले.

1 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 40व्या सामन्यात निकोलस पूरन नावाचं वादळ घोंगावलं. आक्रमक फलंदाजी करत निकोलस पूरनने काही विक्रम रचले. निकोलस पूरनने ख्रिस गेलचे दोन विक्रम धुळीस मिळवले आहेत. कोणते ते जाणून घ्या

2 / 6
अफगाणिस्तानविरुद्द तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या निकोलस पूरनने गोलंदाजांची पिसं काढली. पहिल्या चेंडूपासून त्याचा आक्रमक पवित्रा दिसला. निकोलस पूरनने 53 चेंडूत 8 षटकार आणि 4 चौकार मारत 98 धावा केल्या. आठ षटकरांसह पूरनने एक विक्रम नावावर केला आहे.

3 / 6
ख्रिस गेलने वेस्ट इंडिजसाठी एकूण 79 टी20 सामने खेळले असून 124 षटकार मारले आहेत. आता निकोलस पूरनने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

4 / 6
वेस्ट इंडिजकडून 92 टी20 सामने खेळलेल्या निकोलस पूरनच्या नावावर 128 षटकार पडले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाचा मान त्याला मिळाला आहे.

5 / 6
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 98 धावा करून पूरनच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. वेस्ट इंडिजसाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

6 / 6
ख्रिस गेलने 79 टी20 सामन्यांमध्ये एकूण 1899 धावा केल्या आहेत. तर निकोलस पूरनने 84 टी20 डावांतून एकूण 2012 धावा केल्या आहेत. निकोलस पूरन वेस्ट इंडिजसाठी 2000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला.