T20 World Cup स्पर्धेत सर्वाधिक चौकार-षटकार ठोकणारे फलंदाज, नंबर 1 कोण?
T20I World Cup Most Six And Fours Record In History: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेनिमित्त आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चौकार आणि षटकारांचा विक्रम कुणाच्या नावावर आहे? जाणून घ्या.
1 / 6
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक चौकार लगावण्याचा विश्व विक्रम हा श्रीलंकेचा माजी दिग्गज महेला जयवर्धने याच्या नावावर आहे. जयवर्धने याच्या नावावर 144 चौकारांची नोंद आहे. तसेच सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा रेकॉर्ड हा 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलच्या नावे आहेत. गेलने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत 63 षटकार खेचले आहेत.
2 / 6
जयवर्धनेनंतर सर्वात जास्त चौकार विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराटने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 103 चौकार लगावले आहेत. तसेच सर्वाधिक सिक्सच्या यादीत ख्रिस गेल याच्यानंतर दुसऱ्या स्थानी रोहित शर्मा आहे. रोहितने 35 सिक्स ठोकले आहेत.
3 / 6
श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशान टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. दिलशानच्या नावावर 101 चौकार आहेत. तर इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलर याच्या नावावर 33 सिक्स आहेत. बटलर सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
4 / 6
टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार आणि फलंदाज रोहित शर्मा सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थाननी आहे. रोहितने 91 चौकार ठोकले आहेत. तर टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह 33 षटकारांसह चौथ्या स्थानी विराजमान आहे.
5 / 6
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने 86 चौकार ठोकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन 31 सिक्ससह पाचव्या स्थानी आहे.
6 / 6
ख्रिस गेल याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 78 चौकार ठोकले आहेत. गेल टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चौकार लगावणारा सहावा फलंदाज आहे. तर डेव्हिड वॉर्नर 31 सिक्ससह सहाव्या क्रमांकावर आहे.