Team India : टीम इंडियाचे सर्वात दुर्देवी फलंदाज, विराट-रोहितचाही समावेश

| Updated on: Sep 09, 2024 | 9:26 PM

Indian Cricket Team: आतपर्यंत अनेक फलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये नर्व्हस नाइंटीचे शिकार ठरले आहेत. मात्र टीम इंडियाचे असे 6 फलंदाज आहेत, जे 99 धावांवर बाद झाले आहेत. जाणून घ्या ते 6 फलंदाज कोण ज्यांचं शतक अवघ्या 1 धावेने हुकलंय.

1 / 6
माजी दिग्गज फलंदाज के श्रीकांत वनडेमध्ये 99 धावांवर आऊट होणारे पहिले भारतीय होते. के श्रीकांत 1984 साली इंग्लंड विरुद्ध 99 धावांवर आऊट झाले होते.  (Photo Credit : Icc X Account)

2 / 6
टीम इंडियाचा संकटमोचक अशी ओळख असलेला व्ही व्ही एस लक्ष्मण याचंही एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक अवघ्या 1 धावेने हुकलं होतं.  लक्ष्मण विंडिज विरुद्ध 2002 साली 99 धावांवर माघारी परतला होता.  (Photo Credit : Icc X Account)

3 / 6
टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि प्रशिक्षक राहिलेले  राहुल द्रविड यांचंही शतक 1 धावेने हुकलं होतं. राहुल द्रवड 2004 साली पाकिस्तान विरुद्ध कराची येथे 99 धावांवर बाद झाले होते.  (Photo Credit : Icc X Account)

4 / 6
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक केलंय. सचिन अनेकदा नर्व्हस नाईंटीचा शिकार झालाय.  मात्र सचिन एकाच वर्षात तब्बल 3 वेळा 99 धावांवर बाद झाला. सचिन 2007 साली दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध 99 धावांवर असताना आऊट झाला. (Photo Credit : Icc X Account)

5 / 6
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली आतापर्यंत एकदाच 99 धावांवर बाद झालाय. विराट 2013 साली विंडिज विरुद्ध शतक करण्यापासून वंचित राहिला होता. (virat kohli X Account)

6 / 6
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आजपासून 8 वर्षांपूर्वी 2016 साली 99 रन्सवर माघारी परतला होता. रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध 99 धावांवर आऊट झाला होता. (Rohit Sharma X Account)